वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 9, 2025

वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातर्फे रक्तदान शिबिर



अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत, तसेच राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान या सामाजिक कार्यात सहभाग घेत सेवा दवाखाना अमरावती, नांदगाव पेठ आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय येथे 15 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. उज्ज्वला माळवे, प्रशासन अधिकारी डॉ. राजनारायण गोमासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित कावरे, डॉ. हेमांगी शेरेकर, जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश वाघमारे, डॉ. विनिता आसवानी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, परिचारिका श्रीमती मुळे, यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालय रक्तपेढीची चमू उपस्थित होती. 'एक रक्ताचा थेंब कुणाच्या आयुष्यात नवीन सुर्योदय आणू शकतो' या संदेशासह उपस्थितांना रक्तदानाची प्रतिज्ञा देऊन शिबिराची सांगता करण्यात आली.

            कार्यक्रमाचे संचालन आणि आभार परिचारिका स्नेहा बारसागडे यांनी मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages