राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २८ डिसेंबरला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 9, 2025

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २८ डिसेंबरला

            अमरावती, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत सन २०२५-२६ साठी राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इयत्ता. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. ही परिक्षा 21 डिसेंबर 2025 ऐवजी रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली असल्यामुळे उपरोक्त प्रमाणे तारखेत बदल करण्यात आला आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages