Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

श्री भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न



 अकोट, दिनांक ०१  प्रियंका केदार (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      स्थानिक श्री भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह दिन निमित्य दिनांक २२ ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना २४ सप्टेंबरला झाली त्यानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण, देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल,कारगिल, ऑपरेशन सिंदूर यासंबंधीची माहिती आकोट भूषण जलसेना मध्ये कार्यरत असलेले श्री नीरज संदीप बोबडे व प्रा. डॉ. मेघनाताई पोटे यांनी दिली आहे.तसेच वृक्षदिंडी,वृक्षारोपण, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त दि. २५ सप्टेंबरला 'एक दिन, एक घंटा, एक साथ' राष्ट्र स्वच्छता अभियान तसेच पर्यावरण दिन 'एक पेड माँ के नाम' निबंध स्पर्धा, शहीद भगतसिंग जयंती, जागतिक विश्व हृदय दिन, आरोग्य पोषण आहार, सिकलसेल, ॲनिमिया, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी बाबत कार्यशाळा, निबंध, कविता, पोस्टर स्पर्धा उपक्रम राबविण्यात आले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विवेक पोटे व १०० विद्यार्थी यांच्याकडून राबवण्यात आला आहे.

वृक्षारोपण व वृक्ष पुरविण्याचे कार्य अकोट शहरातील कर्तव्यदक्ष अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. मावळे , श्री बारहाते  व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे .तसेच वृक्षारोपणासाठी श्री. शालिगराम सावळे, श्री. तुकाराम लाखे, श्री. राजूभाऊ धांडे, श्री. दिनेश कुलट, श्री. गायत्री , श्री. वानरे , श्री. मुरलीधर झांबरे, श्री. दामोदर शेंडे, श्री. गंगाधर गावत्रे, श्री सुरेश वैराळे, श्री सपकाळ साहेब, श्री भरक्षे साहेब, तसेच प्रा. एस. डी. बोबडे, प्रा. नामदेव भावे, प्रा. कीर्ती काळबांडे, प्रा.प्रशांत सावळे, प्रा. प्रशांत हिवराले, प्रा. संतोष गहान, प्रा. संतोष बेराड, प्रा. देवानंद बुधवत, प्रा. विधी रावणकार, प्रा. ईश्वरी म्हैसणे, प्रा. श्रीकांत मोहकर, प्रा. प्रशांत वाघ, प्रा. स्वाती वसु, प्रा.प्रगती वसु, प्रा. शारदा लहाने, प्रा. साक्षी गढेकर, प्रा. वृषाली उपासे, प्रा. प्रतीक्षा बायवार, श्री. संजय तेलगोटे व श्री. सुभाष नागळे, या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.सर्व कार्यक्रम प्रा. श्री. प्रवीण रावणकार, उपप्राचार्य डॉ. मेघनाताई पोटे व पर्यवेक्षक श्री. पंजाबराव गावंडे यांच्या मार्गदर्शनात व सहकार्यातून पार पाडले आहे.

सेवा योजना सप्ताहाला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शिरीष  व संचालक मंडळ यांनी वेळोवेळी सदिच्छा भेट दिली व राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.असे शिक्षक कन्हैया गौर यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments