अमरावती, दि. 01 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजुरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागांतर्गत 'मैत्री' कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाअंतर्गत एकूण 1 लाख 6 हजार 390 उद्योग (1, लाख 5 हजार 540 सूक्ष्म, 807 लघु व 43 मध्यम) नोंदणीकृत आहेत. या उद्योजकांना लाभ व्हावा यासाठी मैत्री 2.0 पोर्टलवर 14 विभागांच्या 124 सेवा एकत्रित करून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यात एक खिडकी अर्ज प्रणाली (https://maitri.maharashtra.gov.in), तक्रार समस्या निवारण , हेल्पलाईन मदत कक्ष (Call Centre) - क्रमांक 1800 233 2033, गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक आणि प्रोत्साहन गणना यांसारख्या सेवांचा समावेश आहे. वरील प्रमाणे सेवांचा लाभ आपल्या जिल्ह्यातील सर्व उद्यमी यांना व्हावा, ज्यामुळे जिल्ह्यातील उद्योगाची वाढ होण्यास मोठी मदत होईल आणि एकूणच जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक व गुंतवणूकदारांनी वरील सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
प्रबंध संपादक मनोहर सुने मो. 9422855220 कार्यकारी संपादक ॲड. किरण भुते-917058732684 उपसंपादक डिगांबर सुने- 9890489914 कार्यालय प्रतिनिधी सौ. विद्या दाभाडे-9975431896 कार्यालय प्रतिनिधी निलेश राजस - 9665939082 ग्रामीण उदय न्यूज या चॅनल व पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास अचलपूर न्यायालया अनंतर्गत अन्य कुठेही नाही
Bramandnayak Printing
ग्रामीण उदय
प्रबंध संपादक मनोहर सुने मो. 9422855220
कार्यकारी संपादक ॲड. किरण भुते-917058732684
उपसंपादक दिंगाबर सुने- 9890489914
कार्यालय प्रतिनिधी सौ. विद्या दाभाडे-9975431896
कार्यालय प्रतिनिधी निलेश राजस - 9665939082 ग्रामीण उदय न्यूज या चॅनल व पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास अचलपूर न्यायालया अनंतर्गत अन्य कुठेही नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बघा ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क वर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क (हिंदुस्तान की आवाज)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रामीण उदय साप्ताहिक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📢 ग्रामीण भागातील प्रत्येक घडामोडींचा अचूक वेध!
नेहमी ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 बातम्या व जाहिराती देण्याकरिता संपर्क: 9422855220
मुख्य संपादक: श्री. मनोहर सदाशिव सुने
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 Comments