पत्रकार पतसंस्थाच्या सभासदाकरिता कार्य करणार_ मनोहर सुने - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

पत्रकार पतसंस्थाच्या सभासदाकरिता कार्य करणार_ मनोहर सुने




शिरजगाव कसबा दिनांक २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

    पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विदर्भ शेतकरी कंपनीचे सभागृहात  संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांचे अध्यक्षतेखाली पार पडली आहे. 

ग्रामीण भागात स्थापन झालेली पत्रकार व नागरिक सहकारी पतसंस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकाच्या बळकटी करणा करीता स्थापन झालेली आहे. ११ वर्षापासून पत्रकार पतसंस्थेला सतत ऑडिट  अ वर्ग मिळत आहे. पतसंस्थेच्या ४ शाखा असून तालुका कार्यक्षेत्र आहे. सभासदाच्या आर्थिक बळकटी करना करीता यापुढे कार्य करणार असे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन केले आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागात उच्च गुणवत्ता मिळवलेले कु. अनुष्का सुनील मेंगजे वर्ग १०,कु. प्राची नंदकुमार पोफळे वर्ग १०, श्रेयस  ज्ञानेश्वर टींगने वर्ग १०, अनिकेत माणिकराव थोरात वर्ग १०, पार्थ सुनील गाडगे आयटी मध्ये प्रवेश, कु. जान्हवी सुनील गाडगे एमबीबीएस करिता निवड,कु. जान्हवी संजय पोटे आसाम येथे नवोदय विद्यालय मार्फत  स्पर्धेत सुवर्णपदक,कु. वैष्णवी राजू निचत इंजीनियरिंग मध्ये प्रवेश, कु. पूजा सुरेश फुसे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमधून एसपी ऑफिस हिंगोली मध्ये निवड, यांचा पतसंस्थेतर्फे प्रमाणपत्र ,व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेला आहे.

     याच कार्यक्रमात अमरावती येथे उत्कृष्ट सेवा देत असल्याबद्दल डॉ. शुभम गणेशराव बदुकले व डॉ. कु. साक्षी राजकुमार नीचत यांना शाल,गौरवचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन आई वडीला सहित संचालक मंडळाकडून  सत्कार करण्यात आलेला आहे.


वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सर्व विषयाला मान्यता देऊन  सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. सभासदांनी ६ महिन्यात  केवायसी न केल्यास खाते बंद करण्यात येईल असे ठरविण्यात आले आहे. सभेला संचालक मंडळा सह तालुक्यातील पत्रकार व सभासद हजर होते. सभेचे अहवाल वाचन व संचालन नंदकुमार पोकळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन जयसिंग ठाकूर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages