नवरात्र, अंबादेवी यात्रा उत्सवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

नवरात्र, अंबादेवी यात्रा उत्सवात


शहरातील वाहतूक मार्गात बदल

अमरावती, दि. 20 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शहरात श्री अंबादेवी संस्थान येथे नवरात्र व अंबादेवी यात्रा उत्सव साजरा होतो. या उत्सवाच्या कालावधीत दि. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

बंद करण्यात आलेले मार्ग

सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीसाठी दि. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पुढील मार्ग बंद करण्यात आले आहे. यात राजकमल चौक ते अंबागेट, साबणपुरा खिडकी ते गांधी चौक, ओसवाल भवन ते गांधी चौक, डॉ. धवड यांचा दवाखाना ते गांधी चौक, मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते पंचशील लाँड्री आणि गांधी चौक, भुतेश्वर चौक ते गांधी चौक, नमुना गल्लीकडून अंबादेवी देवस्थानाकडे जाणारे सर्व लहान रस्ते या कालावधीत बंद राहतील. तसेच सक्करसाथ ते भाजीबाजार जैन मंदिरापर्यंत, अंबागेट ते औरंगपुरामार्गे अंबादेवी मंदिराकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील. टांगापडाव ते साबनपुरा पोलीस चौकी ते प्रभात चौक हा रस्ता अरुंद असल्याने जड वाहनास बंद राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

मालवाहू जड व हलकी, गिट्टी, बोल्डर, वाहने जुनी वस्ती बडनेरा टी पॉईंट येथून जुना बायपासमार्गे एमआयडीसी, दस्तूरनगर चौक, चपराशीपुरा चौक, बियाणी चौक येथून डावे वळण घेऊन गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, मालवीय चौक, दीपक चौक मार्गाचा अवलंब करता येईल.

जड व हलकी मालवाहू वाहतुकीस शहरात बंदीच्या अनुषंगाने अधिसूचना अस्तित्वात आहे. त्यानुसार नमूद नियम, मार्ग आणि वेळेचे बंधन वाहनचालकांनी काटेकारेपणे पालन करणे आवश्यक आहे. एसटी बसेस बस स्टँड, राजकमल, गद्रे चौकमार्गे बडनेराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस वाहनांनी राजापेठ-इर्विन चौक या उड्डाणपुलावरून गर्ल्स हायस्कुल चौक, पोलीस पेट्रोल पंप, एस टी. डेपो येथे जाता येईल. यवतमाळ टी पाईंट येथून उजवे वळण घेऊन अकोला वाय पॉईंट येथून सुपर हायवे मार्गे कोंडेश्वर टी पॉईंट, बगीया टी पॉईंट येथून जुना बायपास मार्गे एमआयडीसी, दस्तूर नगर चौक, चपराशीपूरा चौक, बस स्टॅन्ड या पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. एसटी स्टँन्ड येथून नागपुरी गेट मार्गे जाणारी एसटी बस रेल्वे स्टेशन चौक, इर्विन चौक ते चित्रा चौक मार्गे जातील. याच मार्गाने शहरात येऊन गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे एसटी स्टँन्ड येथे जातील. राजापेठ चौकाकडून शहरात येणारी हलकी चारचाकी वाहनधारकांनी राजापेठ उड्डाण पुलाचा वापर करावा.

वाहनतळ पार्कींग व्यवस्था

नवरात्र उत्सवादरम्यान गांधी चौक येथील देवस्थानचे पार्कींग स्थळ बंद राहील. तसेच दोन्ही मंदिरालगत दोनशे मीटर अंतरापर्यंत कोठेही वाहन ठेवता येणार नाही. वाहनतळ पार्कींगची व्यवस्था नेहरु मैदान, ओसवाल भवन मैदान, मुधोळकर पेठ मैदान, ओसवाल भवन ते गद्रे चौकाकडील रस्त्याच्या एका बाजूस तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वळणापासून साई नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस आणि साबनपुरा चौक ते जवाहरगेटकडील रस्त्याच्या एका बाजूस करण्यात आली आहे.

अधिसूचनेचे वाहन चालकांनी पालन करावे. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. सदर आदेश दि. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त शाम घुगे यांनी केले आहे.



--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages