ओबीसी, ईबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; आज अंतिम मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 29, 2025

ओबीसी, ईबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; आज अंतिम मुदत

  

अमरावती, दि. 30 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): ओबीसी, ईबीसी (आर्थिकदृष्ट्या मागास) आणि डीएनटी (विमुक्त जाती, भटक्या जमाती) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उत्तम दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी "Top Class Education in School for OBC, EBC & DNT Students Under PM YASASVI" ही योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. या योजनेंतर्गत 9 वी- 10 वीच्या विद्यार्थ्याला वार्षिक 75 हजार रुपये तर 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्याला  1 लाख 25 हजारपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या मदतीमध्ये वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश आणि कोचिंग फीचा समावेश आहे. योजनेसाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. निवड मागील वर्गातील गुणांवर आधारित मेरिट यादीनुसार होणार आहे, ज्यात 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. ही शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी तसेच टॉप क्लास शाळांच्या मुख्याध्यापकांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने भरून कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आधार-आधारित उपस्थिती आणि नियमित शैक्षणिक प्रगती या अटींचे पालन करणे अनिवार्य आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages