अमरावती, दि. 30 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. अनुसूचित जमाती आणि इतर प्रवर्गातील (D.Ed/B.Ed + TAIT/TET/CTET उत्तीर्ण) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांच्या तुलनेत अनुसूचित जमातीचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, इतर प्रवर्गातील उमेदवारांची मानधन तत्त्वावर नियुक्ती होईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज उद्यापर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. अमरावती यांच्या कार्यालयात सादर करावेत. इतर जिल्ह्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. निवड करताना पेसा क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य मिळेल. अधिक माहिती www.zpamravati.gov.in वर उपलब्ध आहे.
Post a Comment
0 Comments