माजी सैनिकांना फोनद्वारे कौन्सिलिंग करून करिअर प्रशिक्षण देणार; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 29, 2025

माजी सैनिकांना फोनद्वारे कौन्सिलिंग करून करिअर प्रशिक्षण देणार;


15 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 30 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीच्या आणि इच्छित असलेल्या क्षेत्रात (सेक्टरमध्ये) काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे येथील कॅरियर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, इच्छुक माजी सैनिक उमेदवारांना फोनद्वारे समुपदेशन (कौन्सिलिंग) करून त्यांना योग्य ते कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या समुपदेशनामुळे माजी सैनिकांना त्यांच्या क्षमता आणि बाजारपेठेतील मागणीनुसार नवीन करिअर मार्ग निवडण्यास मदत होणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सेना मेडल निवृत्त मेजर आनंद पाथरकर यांनी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी आपले नाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे 15 ऑक्टोबर 2025 या अंतिम मुदतीपूर्वी नोंदवावी, असे त्यांनी कळविले आहे. 

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages