तिवसा येथे स्वच्छता हि सेवा २०२५ श्रमदान कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 29, 2025

तिवसा येथे स्वच्छता हि सेवा २०२५ श्रमदान कार्यक्रम संपन्न




तिवसा नगर पंचायत व केन्द्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय,अमरावती तसेच श्री.देवरावदादा हायस्कूल,तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हि सेवा २०२५ श्रमदान उपक्रम उत्साहात संपन्न

शिरजगाव कसबा दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी): 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ या उपक्रमा अंतर्गत तिवसा नगर पंचायत,

माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार चे केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय,

अमरावती तसेच श्री.देवराव दादा हायस्कूल,तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हि सेवा

श्रमदान उपक्रम काल दि.२९/०९/२०२५ रोजी देवराव दादा हायस्कूल येथे राबविण्यात आला. “एक दिवस

– एक तास – एक साथ” या घोषवाक्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमात देवराव दादा

विद्यालयचे क्रीडांगण व परिसर स्वच्छता कार्यक्रम श्रमदानाच्या माध्यमातून राबवण्यात आला

तसेच स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक व इतर

कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. उपक्रमाचा उद्देश शालेय

मुलांमध्ये व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ

ठेवण्याची सवय अंगीकारणे आणि प्रत्येकाने स्वच्छ भारत निर्मितीत आपले योगदान देणे हा

होता. तसेच या सेवा पंधरवाडा अंतर्गत शाळेमध्ये विविध जनजागृतीचे कार्यक्रम तसेच चित्रकला

आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये

प्रथम क्रमांक अनिकेत रावसाहेब मेश्राम, द्वितीय देविका शरद सोमवंशी ,तृतीय अश्मिरा शाहा व

प्रोत्साहानपर पुरस्कार राधाकिशोर चौधरी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले.

नगर पंचायत प्रशासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले की, “स्वच्छता

ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती आपली दैनंदिन सवय व्हावी. प्रत्येकाने स्वतःच्या

घराबरोबरच सार्वजनिक ठिकाणांचीही स्वच्छता राखली तरच आपले शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ,

सुंदर व आरोग्यदायी बनेल.

नगराध्यक्षा सौ.प्रतिभाताई गौरखेडे, उपाध्यक्षा तथा बांधकाम सभापती सौ.प्रियाताई नरेंद्र विघ्ने,

आरोग्य सभापती अमर वानखडे,विरोधी पक्षनेता अनिलजी थूल व इतर सर्व सन्मानीय

नगरसेवक तसेच शशिकांत पटेल सहाय्यक प्रचार अधिकारी केंद्रीय संचार ब्युरो ,सागर लाडोळे

केंद्रीय संचार ब्युरो, कर्मचारी आणि मुख्याधिकारी शिवदास मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर

पंचायत अधिकारी/कर्मचारी ऋषिकेश देशमुख पा.पु. अभियंता, राहुल इमले स्वच्छता निरीक्षक,

आशिष नांदगावकर (CC), सुधीर विघ्ने (क.ली ), मंगेश कठाने(क.ली),निखील वानखडे,

नीलकमल बोके व इतर सर्व न.पं कर्मचारी, तसेच घनकचरा व्यवस्थापण अधिनस्त सफाई

कर्मचारी व देवरावदादा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रल्हाद चव्हाण तसेच इतर शिक्षक

श्री.जोशी,पर्यवेषक श्री.जितेंद्र चौधरीं, श्री.नागरगोते, श्री अनासाने, श्री.जाधव, सौ.मोहोड श्री.नरेंद्र

काकडे, श्री.मिलखे व विद्यालयीन मुल-मुली यांच्या उपस्थितीत व सहयोगाने सदर उपक्रम

उत्साहात संपन्न झाला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages