चांदूरबाजारमधील विद्यार्थ्यांचा धमाकेदार यश! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 23, 2025

चांदूरबाजारमधील विद्यार्थ्यांचा धमाकेदार यश!



शिवरूप कॉम्बॅक्ट ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली उशू व किक बॉक्सिंगमध्ये विभागीय निवड. 

चांदूरबाजार, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)  

जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, अमरावती येथे १२, १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित जिल्हास्तरीय उशू व किक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये चांदूरबाजारातील शिवरूप कॉम्बॅक्ट ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी धवधवीत यश मिळविले. प्रशिक्षण शिक्षक अनुरूप बंगले, निशांत मानके व मुकेश भोयर यांच्या कुशल मार्गदर्शनाखालील या विद्यार्थ्यांनी केवळ जिल्हा स्तरावरच नव्हे, तर विभागीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे.

उशू स्पर्धेत कुमारी गायत्री मुकेश भोयर (वय १७), कुमारी स्वरा अजय कोंडे (वय १७) व कुमारी काव्या देवीलाल शर्मा (वय १७) यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली असून, या यशाने चांदूरबाजारकरांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. तर किक बॉक्सिंग स्पर्धेत कुमारी आराध्या निलेश तीहीले, कुमारी पल्लवी देवीलाल शर्मा, कुमारी दिव्यांका अडाइंके व कुमारी उत्कर्षा संजय आमझरे यांसारख्या इतर विद्यार्थ्यांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.  

या यशस्वी विद्यार्थिनींचे चांदूरबाजार वाशी यांनी मोठ्या थाटामाटात स्वागत व कौतुक केले. स्थानिक पातळीवर आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यात पालक, शिक्षक व स्थानिक नेते उपस्थित होते. शिवरूप कॉम्बॅक्ट ग्रुपचे संस्थापक व प्रशिक्षकांनी सांगितले की, "हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही, तर संपूर्ण चांदूरबाजारचे आहे. आम्ही ग्रामीण भागातील मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहोत."  

या स्पर्धांमधील यशामुळे चांदूरबाजारच्या क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले असून, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी या विद्यार्थ्यांची तयारी जोरदार सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या यशाचे अभिनंदन करताना, भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages