स्वाधार अर्जातील त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 29, 2025

स्वाधार अर्जातील त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन


अमरावती, दि. 30 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इयत्ता 11 वी, 12 वी तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि शैक्षणिक खर्चासाठी ही योजना राबविली जाते. सन 2024-25 साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, मात्र आवश्यक कागदपत्रे किंवा शासन निर्णयातील अटींनुसार त्रुटी पूर्तता न केल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्रुटींची पूर्तता करावी. विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील आणि अनुदानाचा थेट लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी 0721−2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages