बनावट लेटर पॅड प्रकरणी प्रहार कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 1, 2025

बनावट लेटर पॅड प्रकरणी प्रहार कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल

              बनावट लेटर पॅड प्रकरणी  प्रहार पदाधिकाराविरुद्ध , भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार,

चांदूर बाजार दिनांक  २  डींगाबर सुने  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

      प्रहार पदाधिकाऱ्यांनी अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांची सही स्कॅन करून बनावट लेटर पॅड तयार केल्याप्रकरणी चांदुर बाजार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

     भारतीय जनता पार्टीचे चांदूरबाजार तालुका अध्यक्ष रमेश तायवाडे यांनी प्रहार पदाधिकाऱ्यांनी बनावट लेटर पॅड तयार करून अचलपूर मतदारसंघाचे आमदार श्री.प्रवीण तायडे यांची प्रतिमा मलीन करीत असल्याच्या प्रकरणी  प्रहार पदाधिकारी ऋषिकेश श्रीवास, प्रदीप बंड, प्रसन्न आढाव व सुरेश गणेशकर यांचे विरुद्ध चांदूर बाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ४७४/२०२५ अन्वये ३१८(१),३१८(४),३३६(३),३३६(४),३४०(२),३(५) गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

     गेले ८,१० दिवसांपासून सोशल मीडिया, प्रसार माध्यमांमध्ये अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांचा बनावट लेटर पॅड तयार करून, शिक्का तयार करून त्यावर चुकीचे पत्र दाखवून मतदारसंघांमध्ये दिशाभूल करीत असल्याबद्दल, व सत्तारूढ आमदाराची प्रतिमा मलीन करीत असल्याबद्दल या प्रकरणांमध्ये आणखी कोण सहभागी आहे. याची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आलेली आहे.

    याबाबत ठाणेदार अशोक जाधव यांच्यासोबत संपर्क साधला असता सदर तक्रार प्राप्त झाली असून याबाबत चौकशी सुरू आहे . असे सांगितले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages