अपघातांचे प्रमाण वाढले : रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष !
रुपेश वाळके यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन !
मोर्शी ( ग्रामीण उदय प्रतिनिधी): अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढुर्णा पर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ९६ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या चार ते पाच वर्षामध्येच अनेक ठिकाणी खड्डे व भेगा पडल्यामुळे नांदगावपेठ - पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
नवीन राष्ट्रिय महामार्गावरील सिमेंट रोडवर पडलेल्या भेगा व खड्डे मोठया प्रमाणात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर साडेचार-साडेचार मीटर चे असे पॅनल तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण महामार्गावरील शेकडो पॅनलला भेगा गेल्या असल्यामुळे महामार्गावरील रोड खराब झाला आहे. नांदगाव ते पांढुर्णा महामार्गावरील खराब झालेला हा संपूर्ण रस्ता पुन्हा खोदून नव्याने रास्ता तयार करून या महामार्गावरील मोर्शी येथील नळा नदीवरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे व दापोरी येथील नदीवरील पुलाच्या अपूर्ण कमामुळे अनेक वाहनांचा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असून नांदगाव मोर्शी वरूड पांढूर्णा महामार्गावरील अर्धवट अपूर्ण असलेल्या धोकादायक पुलांची कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन शहरांसह मध्यप्रदेश व अमरावती शहाराला जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वरुड मोर्शी महामार्गाच्या नूतनीकरनासाठी तब्बल ५३० कोटी खर्च करून या ९६ किलोमीटरच्या नांदगावपेठ - पांढुर्णा महामार्गाचे जेमतेम पाच वर्षांपूर्वी बांधकाम करन्यात आले आहे . मात्र एवढ्या छोट्या कालावधीमध्ये या महामार्गाला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नांदगावपेठ ते पांढुर्णा महामार्गावरील सिमेंट रस्त्याच्या कामातील दर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आधी हा महामार्ग डांबरी रोड चा असल्यामुळे जीवघेने खड्डे पडलेले होते त्यामध्ये अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागले अपघातातून वाहन चालकांना मुक्तता मिळावी म्हणून या महामार्गचे काम करण्यात आले. परंतु नव्याने तयार करून बांधण्यात आलेल्या ५३० कोटी रुपयांच्या या अमरावती - पांढुर्णा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे, भेगा पडल्यामुळे झालेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
नांदगाव पेठ ते मध्यप्रदेशातील पांढुर्णा पर्यंत असलेल्या ९६ किलोमीटरच्या या राष्ट्रीय महामार्गात दोन टप्पे आहे. पहिला टप्पा नांदगाव पेठ ते मोर्शी हा ४३ किलोमीटर लांबीचा टप्पा असून यासाठी शासनाने तब्बल २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले तसेच दुसरा टप्पा हा मोर्शी ते पांढुरणा पर्यंत आहे या ५३ कीलोमीटर लांबीच्या कामासाठी तब्बल २९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे परंतु या दोन्ही टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रोड खराब झालेला आहे. रुपेश वाळके यांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे व संबंधित कंत्राटदाराकडे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्याची दखल कोणीही घेत नसून सार्वजनिक बांधकाम संबंधित ठेकेदाराच्या दावणीला बांधला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग कुंभकर्णी झोपेत !
अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून अनेक पूलांची कामे अर्धवट आस्थेत आहे राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय होतांना दिसत आहे अनेक ठिकाणी रस्ता दबलेला असल्यामुळे तो वाहन चालकांना दिसत नसल्यामुळे दोन चाकी चार चाकी वाहन या ठिकाणी उसळतात व वाहनावरून अनेक महिला पुरुष खाली पडतात त्यामध्ये या महामार्गावर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित कंत्राटदार यांना अनेक वेळा माहिती देऊन सुद्धा रस्ता दुरुस्तीचे काम करण्यास तयार नसून या गंभीर विषयावर जिल्ह्यातील एकही लोकप्रतीनिधी बोलायला तयार नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या गंभीर प्रकाराची दाखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. --- रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्शी तालुका.
Post a Comment
0 Comments