अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय प्रतिनिधी): येत्या हंगामापासून आधारभूत दराने खरेदीसाठी ई पिक पाहणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत ई पिक पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबिया, मुग, उडिद, सोयाबिन व तूर खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबाराचा उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्यात आले आहे.
--
Post a Comment
0 Comments