विभागीय आयुक्तालयात ८ सप्टेंबरला विभागीय लोकशाही दिन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 29, 2025

विभागीय आयुक्तालयात ८ सप्टेंबरला विभागीय लोकशाही दिन

 अमरावती, दि. ३० :  विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी) सकाळी ११ वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे.

          विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमून्यात १५ दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

                                                           *****

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages