अमरावती दि. ३० : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्याकरीता परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजूरी दिली आहे. त्यानुसार पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी प्रवेशासाठी राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेकरीता या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाच्या अटी व शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashrta.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच सविस्तर माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
तरी http://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहित नमून्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करून त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे -411001 येथे १ सप्टेंबर २०२५ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****
Post a Comment
0 Comments