रिंगन-संतशिरोमनी सेना महाराज विशेषांक दुसरी आवृत्ती प्रकाशनानिमित्त संतविचार व्याख्यान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 10, 2025

रिंगन-संतशिरोमनी सेना महाराज विशेषांक दुसरी आवृत्ती प्रकाशनानिमित्त संतविचार व्याख्यान


अमरावती दिनांक ११  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     जाणिव प्रतिष्ठाण , आस्था नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अमरावती ,   आणि  ASTHA  EDUCATION & MULTIPURPOSE SOCIETY AMT.  द्वारा आयोजित, रिंगण -संतशिरोमनी सेना महाराज विशेषांक दुसरी आवृत्ती प्रकाशनानिमित्त संतविचार व्याख्यान या कार्यक्रमाचे  आयोजन आज सोमवार दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता तक्षशिला महाविद्यालय, श्याम नगर , अमरावती येथे करण्यात आले आहे.

आषाढी विशेषांक "रिंगण २०२५" चे प्रकाशन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असुन, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे (नामवंत शेतकरी आंदोलक तथा सुप्रसिद्ध लेखक) यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडणार आहे..

    सर्व संतांचे कार्य समोर आणणे हे कार्य " रिंगण प्रकाशन"  करीत असुन,नूकताच संत सेनाजी महाराजांवर अंक प्रसिद्ध केला आहे.  या अंकातुन त्यांनी  संत सेना महाराजांनी आपल्या देशातील बहुतांशी राज्यात केलेले ज्ञानरूप कार्य सर्वानसमोर आणले आहे. संत नामदेव महाराज सोडून असे सर्व भारतात भ्रमण करून कार्य केलेला दुसरा संत आढळने जरा दुर्मिळच. सर्व राज्यातील बांधवांना जोडणारा हा मोठा दुवा आहे  हे विशेष..

       कार्यक्रमास लाभनारे प्रमुख वक्ते सचिन परब( संपादक -रिंगण ) आणि  ह.भ.प. स्वामीराज महाराज भिसे (पुणे ) हे अनुक्रमे,  समतेचे महापुरुष संत सेना  महाराज आणि   "पंजाबातील सेना महाराज " या विषयावर शब्दमाला गुंफतील..

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन - प्राचार्य डॉ. कमलाकर पायस (सचिव, श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती ) तसेच मा.गजानन  अंजनकर (संस्थापक,आस्था गृप , महाराष्ट्र) हे लाभतील. 

       तरी जास्तीत जास्त बांधवांनी या प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती दर्शवावी असे आव्हान आयोजकांन द्वारे करण्यात आले आहे .


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages