पांढरी गावातील नागपंचमी दिवशीच घडली होती घटना
शिरजगाव कसबा दिनांक १ ओमप्रकाश कुऱ्हाडे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी या गावातील राहणारे शेतकरी शेतमजूर देवकुमार बाबाराव गायकवाड वय ४५ यांचा घरी झोपेमध्ये साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तारीख २८ ला मध्यरात्री १ च्या सुमारास देवकुमार आपल्या कुटुंबासह राहत्या घरी झोपेत असताना साप चावल्याने त्यांच्या लक्षात आल्यावर कुटुंबातील इतर सदस्यांना सावध करत प्राण वाचवले परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेत त्यांना तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी दाखल केले नंतर त्यांची तब्येत बिघडत असल्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांना भरती करण्यात आले २ दिवस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला वाचवण्याच्या अथक प्रयत्नांना शेवटी अपयश आले तारीख ३० ला रात्री या देवकुमार गायकवाड शेतकऱ्याने शेवटचा श्वास घेतला त्याच्या कुटुंबामध्ये आई पत्नी व ३ लहान मुले असा परिवार असून कुटुंबामध्ये तो एकमेव कमावता कुटुंबप्रमुख होता या दुखत घटनेमुळे गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या मृत्यूमुळे पांढरी गावात सर्वत्र दुःख हळहळ व्यक्त होत असून नागपंचमीच्या दिवशीच या शेतकऱ्याला साप चावल्याची घटना घडली होती.
Post a Comment
0 Comments