शिरजगाव कसबा दिनांक १ दिगंबर सुने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शेतकरी बळीराजाचे आर्थिक व्यवस्थापन आधीच कोडमले असून नापिकी निसर्गाचा लहरीपणामुळे तोंडी आलेला घास सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रकार होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी आर्थिक विवेचनेत आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्याला चोरट्यांकडून सुद्धा मनस्ताप व आर्थिक भूदंड सहन करावा लागत असल्याची परिस्थिती सध्या शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतशिवारात पाहायला मिळत आहे. गावातील कुऱ्हा जंगल शेत शिवारातील कैलास शामराव राजस यांच्या शेतातील ता.२८ ला मध्यरात्री सुमारास शेतातून ९ पितळ नौझलस्प्रिंकर व १ प्लास्टिक ड्रम असे एकूण २३०० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे .त्यासंबंधी पोलीस स्टेशनला शेतकऱ्याने चोरीची तक्रार दिली असून याआधी काही दिवसांपूर्वीच गावातील विवेक मधुकर कुऱ्हाडे या शेतकऱ्याच्या थुगाव- वडुरा जंगल शिवार शेतामधून ११ पितळ नौझलस्प्रिंकर त्याची किंमत ७००० रुपये असून चोरट्यांनी या शेतकऱ्याच्या शेतातून चोरून नेले असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला सुद्धा देण्यात आली होती सध्या शेतातील चोरीच्या घटनेला स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाकडून गांभीर्याने घेत नसल्याने परिसरातील भुरटे चोरट्यांचे मनोबल वाढले असून त्यांचा शोध घेणे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गरजेचे आहे चोरीची साहित्य कुठेतरी चोरट्यांकडून विकल्या जात असल्याने अशा चोरट्यांना सहकार्य करणाऱ्या अज्ञात दुकानदार व्यवसायिकांचा सुद्धा शोध पोलीस घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी सूर पाहिला मिळत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती साहित्य चोरी घटनेला गांभीर्याने घ्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
.
Post a Comment
0 Comments