जिल्ह्यातील घरकुल योजनेला गती: वाळू वाटप सुनिश्चित - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 1, 2025

जिल्ह्यातील घरकुल योजनेला गती: वाळू वाटप सुनिश्चित

 

अमरावती , २ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील घरकुल योजनेला चांगलाच वेग आला आहे. वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत. अमरावती जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू असून, ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ५४ हजार ९४९ मंजूर घरकुलांपैकी ७ हजार १४८ लाभार्थ्यांना वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे.

          घरकुलांसाठी एकूण २लक्ष १५ हजार १४ ब्रास वाळूची मागणी आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक वापरासाठी १६५ वाळू गट राखीव ठेवण्यात आले असून, त्यातून ५४ हजार ९१८ ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, एकही वाळू गट अद्याप लिलावात गेलेला नाही, त्यामुळे हा संपूर्ण साठा घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत ८ हजार ८७० ब्रास वाळूचे वितरण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय वाळू वाटपाचा तपशील (लाभार्थी संख्या आणि वाटप झालेली वाळू ब्रासमध्ये) अमरावती- १५ लाभार्थी, ७५ ब्रास,  तिवसा- 31 लाभार्थी, 121 ब्रास, भातकुली- २७९ लाभार्थी, २८७ ब्रास, चांदूर रेल्वे- 245 लाभार्थी, 307 ब्रास,  नांदगाव खंडेश्वर- 399 लाभार्थी, 430 ब्रास,  धामणगाव रेल्वे- २०३ लाभार्थी, २३६ ब्रास,  मोर्शी- ४३४ लाभार्थी, ४३४ ब्रास,  वरुड- ४७९ लाभार्थी, ४९० ब्रास, दर्यापूर- 265 लाभार्थी, 628 ब्रास, अंजनगावसुर्जी- ३५० लाभार्थी, ३५० ब्रास, अचलपूर- २ हजार ७३१ लाभार्थी, २ हजार ९९१ ब्रास, चांदूरबाजार-217 लाभार्थी, 1 हजार 21 ब्रास,  धारणी- १ हजार ५०० लाभार्थी, १ हजार ५०० ब्रास,   चिखलदरा-० लाभार्थी, ० ब्रास.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages