सहकार व्यवस्थापन पदविका (डि. सी. एम.) प्रवेश सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 10, 2025

सहकार व्यवस्थापन पदविका (डि. सी. एम.) प्रवेश सुरू


अमरावती, दि. ११  (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांच्या वतीने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका (डि. सी.एम.) अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळुन हा अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने १३ सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे.

सदर अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. १  जुलै ते ३१  डिसेंबर २०२५  या मदतीकरीता दि. १  जुलै ते ३०  जुलै २०२५ या मुदतीत प्रवेश देणे सुरू आहे. त्या करीता प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधुन प्रवेश निश्चित करावा. संपर्क क्रमांक-9881047668 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages