अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना आता रोजगार विषयक सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या असून, 'ई-आर 1' (ER-1) प्रपत्र ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'ई-आर 1' सादर करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०२५ आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाने सुरू केलेल्या या ऑनलाइन सुविधांसाठी www.rojgar.
जून २०२५ रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठीचे 'ई-आर 1' प्रपत्र सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी उद्योजक आस्थापनांनी त्यांच्या युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन सादर करायचे आहे. तसेच, सादर केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून लगेच प्राप्त करून घ्यावे.
ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 'ई-आर 1' ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी कळवले आहे.
Post a Comment
0 Comments