मेळघाट जिल्हा भाजप वतीने संकल्प सिद्धी अभियान समारोप कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, July 6, 2025

मेळघाट जिल्हा भाजप वतीने संकल्प सिद्धी अभियान समारोप कार्यक्रम संपन्न



अचलपूर दिनांक ७  (ग्रामीण उदय प्रतिनिधी)   भारतीय जनता पार्टी मेळघाट जिल्हा अमरावती ग्रामीण च्या वतीने संकल्प से सिद्धी तक अभियान समारोप व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त जोगेश्वरी मंगल कार्यालय अचलपूर येथे भव्य जनसंवाद व कार्यकर्ता  मेळावा घेण्यात आला.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष मेळघाट जिल्हा अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रभू दास जी भिलावेकर होते प्रमुख उपस्थितीत खासदार डॉक्टर अनिलजी बोन्डे  होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस गजानन  कोल्हे होते तर कार्यक्रमाचे नियोजन आयोजन अभय माथने यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सुधीर  रसे , साहेबराव काठोळे, विलास कवीटकर, शशिकांत जयस्वाल, पन्नालालजी अग्रवाल, विनिता  वर्मा, नयनाताई जोशी, विनोद  खेरडे , रवींद्र  गवई, नंदकुमार वासनकर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनश्रीताई देशपांडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता अचलपुर परतवाडा शहरातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात उपवास असून सुद्धा मातृ शक्तीने आपली उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाला मेळघाट जिल्ह्यातील व अचलपूर परतवाडा शहरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages