नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्जांसाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्जांसाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

 

अमरावती, दि. २३  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) 2.0 वर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५  आहे. शाळा स्तरावरील पडताळणीची अंतिम मुदत १५  सप्टेंबर २०२५, तर जिल्हा स्तरावरील पडताळणीची अंतिम मुदत ३०  सप्टेंबर २०२५ आहे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांचे आधार कार्डावरील नाव, बँक खात्याचे नाव आणि NMMS परीक्षेच्या गुणपत्रकातील नाव एकसारखे असणे बंधनकारक आहे. या अटीची पूर्तता न केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तसेच, सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी INO (Institutional Nodal Officer) आणि HOI (Head of Institution) निश्चित करून एनएसपी पोर्टलवर FACE AUTHENTICATION (OTR) करणे अनिवार्य आहे.

सन २०२४-२५  मध्ये NMMS परीक्षेद्वारे निवड झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज आधारकार्डनुसार भरणे आवश्यक आहे. तर, इयत्ता १०  वी, ११ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज भरणे बंधनकारक आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन NSP 2.0 पोर्टलवरच अर्ज करावेत. विहित मुदतीपूर्वी शाळा व तालुका स्तरावरून नवीन व नूतनीकरण अर्जांची पडताळणी पूर्ण करावी. त्रुटी असलेले अर्ज त्वरित दुरुस्त करून मुदतीपूर्वी ऑनलाइन भरून पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                                       

--


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages