आणीबाणीवर आधारित जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आज उद्घाटन


अमरावती, दि. २५  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : देशात १९७५  ते १९७७  दरम्यान आणिबाणी होती. या काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आल्या आणि प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादली गेली. याबाबत आवाज उठवणाऱ्या अनेक व्यक्तींना तुरुंगवास झाला. त्याचे स्मरण म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज  बुधवार, दि. २५  जून रोजी सकाळी १०  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे  या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त श्वेता सिंघल तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

            आणीबाणी संदर्भातील प्रदर्शनासोबतच यावेळी  ज्या व्यक्तींना बंदिवास भोगला अशा आणीबाणीतील कार्यकर्ते तसेच नागरिकांचा प्रशासनामार्फत महसूल भवन येथे सन्मानित केले जाणार आहे. या समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र बहाल केले जाणार आहे.

            या समारोहास जिल्ह्यातील सर्व मिसा व डीआयआर अंतर्गत आणिबाणी सन्मानधारक यांना समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर  यांनी केले आहे.


 

--

Post a Comment

0 Comments