Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित

    


दि.  २ जून , २०२५ 

    

           अहिल्यानगरदि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि): अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित लोकराज्य च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ३१ मे २०२५ रोजी  करण्यात आले.

 

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यात  आयोजित या प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमहाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,  आमदार गोपीचंद पडळकरआमदार विठ्ठलराव लंघेआमदार बाबासाहेब देशमुखआमदार शिवाजी कर्डीलेआमदार नारायण पाटीलआमदार अमोल खताळआमदार चित्रा वाघआमदार काशिनाथ दातेआमदार मोनिका राजळेआमदार सुरेश धसमाजी आमदार अण्णासाहेब डांगेमाजी आमदार रमेश शेंडगेप्रा.लक्ष्मण हाकेजिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर जन्म त्रिशताब्दी निमित्ताने तयार करण्यात आलेले बोधचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्यत्यांचे महाराष्ट्रातील कार्यधर्मपरायणतासमाजकार्यराज्यकारभाराचा आदर्शदातृत्वत्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची माहिती अंकात देण्यात आली आहे.

 

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख अंकात समाविष्ट आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने जन्म त्रिशताब्दी उत्सवानिमित्त घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देखील या अंकात देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments