पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन



 

अहिल्यानगर दि. २ जून २०२५  (कार्यालय प्रतिनिधि): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी ता.जामखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

 

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेआमदार गोपीचंद पडळकरजिल्हाधिकारी डॉ.पंकज आशियाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते  महाआरतीही करण्यात आली.

 

Post a Comment

0 Comments