अमरावती, दि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि) : धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन २०२५-२०२६ अंतर्गत मंजूर योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षणाकरीता तारजाळी सोलर फेनसिंग ८५ टक्के, आदिवासी युवतींना ८५ टक्के अनुदानावर शिलाई मशिन खरेदी, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन संच ८५ टक्के, आदिवासी बचतगटांना ८५ टक्के अनुदानावर मंडप डेकोरेशन, डीजे साऊंड साहित्य खरेदी, आदिवासी महिला-पुरुष बचतगटांना ८५ टक्के अनुदानावर दालमिल उभारणी, अनुसूचित जमातीच्या बचतगटास ८५ टक्के अनुदानावर फिरते फास्ट फुड सेंटर, आदिवासी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर फिटींग, इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल, सुतार काम व इतर व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी सुशिक्षित युवकांच्या बचतगटांना ८५ टक्के अनुदानावर संगणक संच, प्रिंटर, यूपीएस व तत्सम साहित्य, आदिवासी बेरोजगार लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर पॉपकॉर्न मशिन साहित्य खरेदी, आदिवासी महिला-पुरुष बचतगटांना ८५ टक्के अनुदानावर बेकरी प्रोसेसिंग मशिन खरेदी, वैयक्तिक वनहक्क प्राप्त आदिवासी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर तारकुंपण, अनुसूचित जमातीच्या दिव्यांग लामार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, अनुसूचित जमातीच्या वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी १०० टक्के अर्थसहाय करणे या योजना राबविण्यात येणार आहे.
सदर योजनेसाठीचे अर्ज nbtribal.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विकास शाखा दूरध्वनी क्र ०७२२६-२२४२१७ वर संपर्क साधावा. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. १५ जुलै २०२५ आहे.
प्राप्त ऑनलाईन अर्जाच्या ज्येष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येतील. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्या, निराधार महिलांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments