*कौशल्य विकास विभागाचे आवाहन
*बेरोजगार उमेदवारांसाठी नि:शुल्क सोय
अमरावती, दि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि ) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अभ्यासिका योजना पूर्ववत सुरू झाली आहे. यासाठी तरुणांना नि:शुल्क नोंदणी करून अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाने केले आहे.
अभ्यासिकेमध्ये वर्तमानपत्रे, मासिके, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि रोजगारविषयक माहिती उपलब्ध राहणार आहे. अभ्यासिका शासकीय कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नोंदणी अर्ज सादर करावा लागणार आहे. अभ्यासिका जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानिया मशिदीच्या बाजूला, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे सुरू राहणार आहे.
अभ्यासिकेत सुसज्ज इमारत, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह, स्पर्धा परीक्षा पुस्तके, मोफत वाय-फाय सुविधा, तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ८६०५६५४०२५ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments