अमरावती, दि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि ) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) आणि (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहेत.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात दि. १ जून ते १५ जून २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments