अमरावती, दि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि): राज्य शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने राज्यात दुसरा क्रमांक पटकविला आहे. कामकाजाचे नियोजन, व्यवस्थापन, लोकाभिमुख संकल्पना, शासकीय योजनामध्ये समन्वय आणि कठोर निर्णयाने हे यश मिळाले आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने सुसज्ज ग्रंथालय, मागेल त्याला नोकरी, मागेल त्याला कौशल्य प्रशिक्षण, मागेल त्याला युवा कार्य प्रशिक्षण, मागेल त्याला व्याज परतावा योजनेसाठी विविध योजना राबविल्या आहे. यामुळे उमेदवारांचा वेळ, पैसा, श्रम यामध्ये बचत झाली आहे. विविध लोकाभिमुख संकल्पना ठेवत सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी नियोजनबद्ध व्यवस्थापन केले आहे.
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या स्पर्धेत योग्य पद्धतीने नियोजन करीत यश मिळविले आहे. यानंतरही युवकांच्या मदतीसाठी कामे करण्यात येणार आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, तसेच विभागातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले असल्याचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी सांगितले. यासाठी कार्यालयातील अभिषेक ठाकरे, वैशाली पवार, जितेंद्र गायकवाड, सुभाष गुल्हाने, प्रवीण जगताप, प्रवीण बाबोळे, सोनाली भोगे, अश्विनी जयसिंगपुरे, अनिता नांदुरकर, अतुल गवई, प्रथमेश सोहळे, वैष्णवी कुयरे यांनी मेहनत घेऊन निकष पूर्ण केले.
Post a Comment
0 Comments