ग्रामीण उदय दि.१९
(सौ विद्या दाभाडे)
कृषी सहाय्यकांनी राज्यभरात पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे स्मार्ट ,पीएम किसान ,पोखरा या मुख्य योजनांची कामे ठप्प झाली असून अवकाळी आलेल्या पावसामुळे झालेले नुकसान पंचनामे ची कामे प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
१५ दिवसात खरीप हंगाम सुरू होणार आहे. खरीप हंगाम पूर्व बीजप्रक्रिया मोहीम प्रात्यक्षिकांच्या नियोजन २८ उपक्रमाची कामे ही थांबलेली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव कृषी विभाग विकास चंद्र रस्तोगी यांच्याशी संपर्क केला असता कृषी सहायकांच्या संपाबाबत एक पत्र मिळाले आहे. कृषी आयुक्ताच्या पातळीवर बैठक घेऊन समजूत काढली आहे. परंतु खरिपाच्या तोंडावर कृषी सहायकांनी संप करणे बरोबर नाही . शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांनी सहकार्य करावे असे त्यांनी मत मांडले आहे.
शेतकरी पिकवीत असलेल्या अन्नधान्यावर सर्व उद्योजक व नोकरशहा जगत आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन संप केला तर काय होईल हे कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असे न होता कृषी सहाय्यक पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे हे चुकीचे आहे. याबाबत महाराष्ट्र कृषिमंत्र्यांनी तात्काळ कृषी विभागाची बैठक घेऊन तोडगा काढावा असे मत भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष मनोहर सुने यांनी व्यक्त केले आहे.
पेरणीच्या तोंडावर कृषी विभागांनी यावर तोडगा न काढल्यास कृषी विभाग योजनाची कामे होणार नाही. पर्यायाने बियाणे लागवड वर ही परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments