श्री. भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोटच्या विद्यार्थ्यांची गौरवशाली यशाची परंपरा कायम.... - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 15, 2025

श्री. भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोटच्या विद्यार्थ्यांची गौरवशाली यशाची परंपरा कायम....

 


आकोट दिनांक  १६

स्थानिक भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट येथे दिनांक १४ मे रोजी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करण्यात आले . त्यानंतर मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री शिरीष पोटे (अध्यक्ष छत्रपती शाहू शिक्षण संस्था अकोट )प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सौ मेघनाताई पोटे (सचिव छत्रपती शाहू शिक्षण संस्था अकोट )विद्यालया व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री पी. बी. रावणकार पर्यवेक्षक श्री पी.एम. गावंडे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता दहावीच्या परीक्षेला विद्यालातून  परीक्षेला...... प्रविस्ट 233पैकी 01गैरहजर उर्वरित 232पैकी 232पास परीक्षेचां शेकडा निकाल   99.57 या 232 विद्यार्थ्यांपैकी 07विद्यार्थ्यांनी 90% च्या वर गुण मिळविले तर 24  विद्यार्थ्यांनी 85% च्या वर गुण प्राप्त केले अशा सर्व  गुणवंत विध्यार्थी व त्यांचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला गुणगौरव, प्रमाणपत्र,व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी सोहम संजय काळे व द्वितीय कु अपेक्षा अनिल पिलातर, तसेच व्यंकटेश शैलेश मुंगसे , तुषार दीपक भटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक एस. एस. गोपनारायण , दिवंगत गोपाल चव्हाण, श्री पी. एम. गावंडे, कु. जे. के. बोरसे, आणि सर्व शिक्षक शिक्षिका, अध्यक्ष ,सचिव ,प्राचार्य ,शिक्षकेतर कर्मचारी, व आई वडील यांना दिले त्याचबरोबर पालकांमधून अनिल पिलातर व मुंगसे ताई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी बी रावणकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अकरावीची प्रवेश प्रक्रिया समजून सांगितले तर मा. श्री शिरीष पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सदैव मदत करू व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक श्री पीएम गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री के सी गौर यांनी केले.कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. असे प्रसिद्धी प्रमुख शिक्षक कन्हैया गौर यांनी कळविले आहे.....


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages