जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 13, 2026

जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा

 


३०० खेळाडूंचा सहभाग

 

अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): येथील तपोवन चौकातील जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने १७ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेला मंगळवार १३ ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. १५ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये ३०० खेळाडू सहभागी होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

 

या स्पर्धेत अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, लातूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक या ८ विभागांतील एकूण ३०० मुले व मुली सहभागी होणार आहे. स्पर्धेसाठी पंच, तांत्रिक अधिकारी आणि व्यवस्थापक अमरावतीत दाखल झाले आहेत. सर्व सामने हे सकाळ व दुपारच्या सत्रात खेळवले जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. मुलांची राहण्याची सोय श्री. गुरुदेव प्रार्थना मंदिर, नागपूर रोड येथे, तर मुलींची व्यवस्था क्रीडा प्रबोधिनी, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे करण्यात आली आहे. सर्व स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था स्पर्धा स्थळी  करण्यात आली आहे.

 

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आल्या आहेत.तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद काटोलकर,राजू वडते,अनिल इंगळे,सलीम शेख,संतोष विघे यांच्यासह क्रीडा अधिकारी त्रिवेणी बान्ते, वैशाली इंगळे व इतर कर्मचारी या आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages