ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची देशपातळीवर उत्तुंग झेप; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 1, 2026

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची देशपातळीवर उत्तुंग झेप;

शिरजगाव कसब्याचा ओमेश निचत 'नीट पीजी' परीक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये ५०७ वा!

दि.२ शिरजगाव कसबा / चांदूर बाजार:


वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय पातळीवरील 'नीट पीजी २०२६' (NEET PG 2026) प्रवेश परीक्षा शिरजगाव कसबा येथील ओमेश साहेबराव निचत यांनी घवघवीत यशासह उत्तीर्ण केली आहे. त्यांनी या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत 'ऑल इंडिया रँकिंग'मध्ये (AIR) ५०७ वा क्रमांक पटकावला असून, चांदूर बाजार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
एका लहानशा गावातून आलेल्या ओमेश यांनी आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील या आव्हानात्मक स्पर्धेत हे उत्तुंग यश मिळवले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात. अशा अत्यंत तीव्र स्पर्धा असलेल्या परीक्षेत देशात ५०७ वा क्रमांक मिळवणे, ही त्यांच्या कठोर मेहनतीची आणि प्रामाणिक प्रयत्नांचीच पावती मानली जात आहे.
ओमेश यांच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शिक्षकांसह संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात जिद्द ठेवून मेहनत आणि सातत्य राखल्यास ते देखील देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, असा एक अत्यंत प्रेरणादायी संदेश ओमेश यांच्या या कामगिरीतून परिसरातील इतर विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages