मोर्शी तालुक्यात कोतवालांची चार रिक्त पदांची पदभरती सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, October 11, 2026

मोर्शी तालुक्यात कोतवालांची चार रिक्त पदांची पदभरती सुरू

 


 

17 ऑक्टोबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तिथी

 

11 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा

 

अमरावती, दि. १२(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : तालुक्यात कोतवाल संवर्गातील रिक्त असलेली चार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पांढी, लेहगाव, धामणगाव आणि मंगरूळ या साज्यांचा समावेश असून प्रत्येक साज्यात एक पद भरले जाणार असल्याची माहिती कोतवाल निवड समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली.

 

       आरक्षणानुसार पांढी येथे खुल्या प्रवर्गातून, लेहगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस), धामणगाव येथे भटक्या जमाती-क प्रवर्गातून, तर मंगरूळ येथे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गातून पदभरती होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालय, मोर्शी येथे आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार  नाही.

 

           भरती प्रक्रियेनुसार अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी, लेखी परीक्षा आणि अंतिम निवड यांसह विविध टप्प्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.यानुसार पात्र उमेदवारांची अंतिम यादी ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १.३० वाजे दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर उत्तरतालिका, निकाल आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून २६ नोव्हेंबर रोजी निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.ही भरती प्रक्रिया तहसीलदार सागर ढवळे यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages