अवैध दारू विक्री विरोधात गावकऱ्यांचे पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदन, उपोषणाचा इशारा*
विलास खाजोने/चांदुर बाजार
दिनांक ९
- तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनोरी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असुन पोलिस प्रशासन सातत्याने याकडे दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी जात असुन गावातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.त्यामुळे गावातील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन अवैध दारू बंदीसाठी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय,चां.बा.यांना निवेदन देऊन दारू बंदीसह इतर सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.अन्यथा १० आक्टोबर२६ पासून उपोषण करण्याचा इशारा वैभव सतिश देशमुख यांनी दिला आहे.
गावातील तरुणांचे भविष्य व गावातील सौहार्द निरोगी व सुदृढ राहावे यासाठी दारू बंदी होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यावर संबंधित पोलिस प्रशासन व वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
