जिल्ह्यातील सीजीडब्ल्यूबी भूजल डेटा विषयावर कार्यशाळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 7, 2026

जिल्ह्यातील सीजीडब्ल्यूबी भूजल डेटा विषयावर कार्यशाळा



अमरावती, दि. ८ (
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  केंद्रीय भूजल बोर्ड (सीजीडब्ल्यूबी) मध्यक्षेत्र नागपूर आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण अमरावती कार्यालयाच्यावतीने ‘अमरावती जिल्ह्याती सीजीडब्ल्यूबी भूजल डेटा आणि राष्ट्रीय जलभृत मानचित्रण व व्यवस्थापन अभ्यासाचा प्रसार-उपयोग’ विषयावर बचत भवन येथे ३ सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

                        कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे होते. सीजीडब्ल्यूबी मध्यक्षेत्र नागपूरच्या शास्त्रज्ञ श्रद्धा जैन यांनी, ‘अमरावती जिल्ह्यातील ‘नाक्विम’च्या निष्कर्षांवर’ तर याच संस्थेचे शास्त्रज्ञ हितेश रामटेके यांनी सीजीडब्ल्यूबीच्या भूजल पोर्टलबाबत सादरीकरण केले. याच कार्यशाळेत अमरावती जिल्ह्याचा नाक्विम व्यवस्थापन आराखडाही सामायीक करण्यात आला.

 

उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी भूजल डेटाच्या प्रसारासाठी सीजीडब्ल्यूबीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत जिल्हा पातळीवरील नियोजन व शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी उपलब्ध संसाधनाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे आपल्या उद्बोधनात सांगितले. कार्यशाळेला जीएसडीए,महानगर पालिका,जिल्हा परिषद लघुसिंचन,जलसंपदा विभाग,मजीप्रा,आरडब्ल्यूएसएस,जिल्हा प्रयोगशाळा,आरडब्ल्यूएस,कृषी विभाग आदी विभागांचे ७४ अधिकारी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages