विविध स्पर्धांचे आयोजन व खेळाडूंचा गौरव करत क्रीडादिन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 1, 2026

विविध स्पर्धांचे आयोजन व खेळाडूंचा गौरव करत क्रीडादिन साजरा

 

 


 


अमरावती, दि.२ (
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा, सायकल रॅली आणि खेळाडूंचा गौरव करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

            


 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने ‘एक घंटा खेल के मैदान मे’ या संकल्पनेवर आधारीत विशेष क्रीडा उपक्रमाचे २८ ऑगस्‍ट रोजी  उद्घाटन करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी येथील विभागीय क्रीडा संकुलात बॅडमिंटन,टेबल टेनिस,स्क्वॅश,आर्चरी,व्हॉलीबॉल या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. शिव छत्रपती पुरस्कारार्थी नितीन चव्हाळे ,मंगेश व्यवहारे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

         या उपक्रमांतर्गत ३० ऑगस्ट रोजी  विभागीय क्रीडा संकुल येथून ‘संडे ऑन सायकल, रन अँड राईड’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय खोडके आणि राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त पराग नवलकर  यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकस्वारांना रवाना केले. अमरावती सायकलींग असोसिएशनचे सायकलपटू ,खेळाडू,नागरीक, युवक-युवती या सायकल रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी झाले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages