डॉल्बी - लेझरला फाटा देत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा !! महा .अनिस अम .
देशातील सर्वच सण- उत्सव हे पर्यावरण स्नेही करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेले आहे.
पर्यावरण स्नेही उत्सवासाठी समितीने सुरुवातीपासून व्यापक प्रबोधन व कृती कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये 'विसर्जित गणपती दान करा - निर्माल्य गोळा करा', ' फटाके मुक्त दिवाळी, फटाके मुक्त नवीन वर्ष, 'होळीची पोळी गरजूला द्या होळी लहान करा', बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर, 'पर्यावरण स्नेही रंगपंचमी' असे विविध उपक्रम समाजात राबवण्याचे काम महा अंनिस ने केले आहे. समितीने सुरू केलेले हे उपक्रम समाज व शासनमान्य झालेले आहेत.सर्व जाती धर्मातील सण उत्सव हे पर्यावरणपूरक व्हावेत ही अंनिस ची भूमिका राहिलेले आहे.
मानवी जीवनाला तसेच पशुपक्ष्यांना घातक ठरणाऱ्या डॉल्बीचा दणदणाट गेल्या काही वर्षात वाढत आहे, राज्यातून हद्दपार झालेली डॉल्बी गेल्या काही दिवसात पुन्हा जोमाने डॉल्बीचा आवाज घुमू लागला आहे.राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने डॉल्बी चा आवाज वाढत आहे.डॉल्बी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरीकांना आवाहन आहे की या पर्यावरण पूरक कार्यक्रमाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.येणाऱ्या गणेश उत्सवात या डॉल्बीचा आणि लेझर बीम चा वापर टाळून पर्यावरण स्नेही गणेश उत्सव करण्याचा अहवाल संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.या बाबत आम्ही राज्यभर प्रबोधन करीत आहोत. धार्मिक सणातील श्रद्धेशी या डॉल्बीचा काहीही संबंध नाही. श्रद्धेचा संबंध भक्तिशी असतो आणि डॉल्बीचा संबंध उन्मादाशी आहे. सर्वांनाच त्रासदायक ठरणाऱ्या डॉल्बीला समाजातून हद्दपार करण्याचा निर्धार करूया.असे आवाहन संजय बनसोडे राज्य कार्याध्यक्ष महा.अनिस महाराष्ट्र, गजेंद्र सुरकार राज्यप्रधान सचिव, प्रफुल्ल मंदा श्रीधर जिल्हा कार्याध्यक्ष अम. विजय डवरे- सुभाष गौरखेडे जिल्हाप्रधान सचिव, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, वर्षा गावंडे, दिलीप लाडे, वैशाली राऊळ, भूमिका पहूरकर, नरेंद्र धर्माळे, आशिष देशमुख, राहुल खंडारे, संदीप हिवराळे, विजया करोले, प्रतिभा खापरे महा. अनिस अमरावती चे सर्व पदाधिकारी व साथी यांनी केले आहे.