ग्रामीण पोलिसांचा 'ऑपरेशन कवच' उपक्रम
अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती ग्रामीण पोलिसांच्या व्यसनमुक्तीकरिता राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन कवच' अंतर्गत निर्मित 'नॉट नॉर्मल' या व्यसनविरोधी लघुपटाच्या ट्रेलरचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी 21 सप्टेंबर रोजी नियोजन भवन येथे अनावरण करण्यात आले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे पार पडलेल्या विविध आढावा बैठकांनंतर लघुपटाचे अनावरण करण्यात आले. आमदार सर्वश्री प्रताप अडसड,उमेश यावलकर, प्रवीण तायडे, रवि राणा,केवलराम काळे यांच्यासह विभागीय आयुक्त नयना गुंडे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक निकेतन कदम यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमीत शाह यांच्या दूरदृष्टीतून राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त भारत' अभियानाला बळ देण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'नशामुक्त महाराष्ट्र' या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्ह्यात ‘ऑपरेशन कवच’ च्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पुढाकार व मार्गदर्शनाखाली स्थानिक कलाकारांना घेवून ‘नॉट नॉर्मल’ या लघुपटाची निर्मिती झाली आहे. स्थानिक कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी म्हणून या व्यसनविरोधी मोहिमेत सहभाग घेतला आहे.
तरुणाईला ड्रग्ज आणि विविध व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि 'नशेचा नकार… जीवनाचा स्वीकार!' हा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रेम माणिक यांनी केले असून, छायाचित्रणाची धुरा शुभम जगदाळे यांनी सांभाळली आहे. यात मुख्य भूमिकेत ईश्वर सुतार, शितल भिलावेकर आणि आरिश शाह या स्थानिक कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे.
हा लघुपट समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेवर प्रकाश टाकणारा असून, 'नशामुक्त महाराष्ट्र' घडवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास लोकार्पण सोहळ्यात व्यक्त करण्यात आला. या लघुपटाचा पूर्ण ट्रेलर आता https://youtu.be/q4ex7vdWYIs?