जिल्ह्यातून चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी *जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 30, 2026

जिल्ह्यातून चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी *जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



 

अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हिरवा व वाळलेला चारा, गवत आणि वैरणीची विक्री व वाहतूक करण्यास तातडीने बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत.


 

सन 2026 च्या खरीप हंगामात घोषित करण्यात आलेल्या 'ट्रिगर-१' मध्ये जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पशुधनाला पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहावा या उद्देशाने 'महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001' मधील तरतुदींचा वापर करून ही वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.

 

हा आदेश 29 सप्टेंबर 2026 पासून पुढील पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस प्रशासन, महसूल विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages