संत गुलाबराव महाराजांनी विश्वाला धर्म, आणि समन्वयाचा विचार दिला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 28, 2026

संत गुलाबराव महाराजांनी विश्वाला धर्म, आणि समन्वयाचा विचार दिला


*  सरसंघचालक मोहनजी भागवत* 

* माधान येथे आर्शिवाद प्रबोधन. 

विलास खाजोने/चांदुर बाजार

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 



     आर्शिवाद प्रबोधन सभा असे कार्यक्रमाचे नाव ठेवले असले तरी  खऱ्या अर्थाने  मी श्री संत गुलाबराव महाराजांचा आर्शिवाद घेण्याच्या  खऱ्या वृत्तीने माधान येथे आलो आहे. गुलाबराव महाराजा सारखे संत ,विशिष्ट प्रयोजन घेऊन जन्माला आले असून ,त्यांनी विश्वाला धर्म आणि समन्वयाचा विचार दिलेला आहे. असे उद्बबोधन सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी यांनी केले आहे 

ते  श्री क्षेत्र माधान येथे आयोजित केलेल्या आर्शिवाद प्रबोधन या कार्यक्रमात श्री संत गुलाबराव महाराज यांच्या  भक्त परिवाराला मार्गदर्शन करताना बोलत होते. 

  श्री. संत गुलाबराव महाराज संस्थान माधान येथे संस्थेच्या वतीने सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे आर्शिवादरुपी  प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या   वैचारिक व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध मोहोड सचिव साहेबराव मोहोड  उपस्थित होते. 

पुढे सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले संत जन्म घेण्याकरिता ज्या  स्थानाची निवड करतात ते स्थान छोटे नसते 

 गाव केवळ आकाराने छोटे किंवा मोठे होत नसते, तर त्या गावातील लोकांची गुणवत्ता, निष्ठा आणि अध्यात्मिक अधिष्ठाण त्या गावाला महान बनवते.  श्री संत गुलाबराव महाराज

सारख्या विभूतीचा सहवास आणि आशीर्वाद माधान येथे लाभला असल्याने  माधान  हे  स्थान तीर्थक्षेत्रासमान आहे. महाराजांचे कार्य ईश्वरी कार्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराजा नंतर एक विशिष्ट योजनेतून श्री संत गुलाबराव महाराज आपले कार्य करून गेले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages