शिरजगाव कसबा दि. ११ :-
अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथे वाघिणीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी यंदाचा पोळा सण रद्द केला आहे. उत्सवाचा खर्च टाळून गावकऱ्यांनी पीडित कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे
पोळा सणाच्या काही दिवस आधी शिरसगाव परिसरामध्ये वाघिणीने केलेल्या भीषण हल्ल्यात दिनेश आवारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अत्यंत दुःखद प्रसंगामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे
🤝 सामाजिक बांधिलकी: पोळा उत्सव रद्द
शिरजगाव कसब्यामध्ये प्रतिवर्षी पत्रकार सहकारी पतसंस्था, विदर्भ शेतकरी कंपनी व कार्तिक मंदिर यांच्या वतीने अत्यंत उत्साहात पोळा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये सुदृढ व सजावट केलेल्या बैलजोड्यांना बक्षिसे दिली जातात
मात्र, गावात ओढवलेल्या दुःखद प्रसंगामुळे पोळा उत्सव समिती आणि गावकऱ्यांनी एकमुखाने यंदाचा मुख्य जाहीर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
केवळ सण रद्द न करता, गावकऱ्यांनी माणूसकीचे दर्शन घडवत उत्सवाच्या बक्षिसासाठी आणलेले संपूर्ण साहित्य आणि वस्तू मृत दिनेश आवारे यांच्या कुटुंबाला भेट म्हणून दिल्या
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत:
पीडित आवारे कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे
कुटुंबाला धीर देण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे लेखी हमीपत्र (लेखी आश्वासन) देखील दिले आहे
संकटकाळात संपूर्ण शिरजगाव मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून, गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे .