‘महा वॉकेथॉन’मध्ये युवकांचा उत्साहात सहभाग - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 21, 2026

‘महा वॉकेथॉन’मध्ये युवकांचा उत्साहात सहभाग


*71 हजार रूपयांच्या बक्षीसाचे लकी ड्रॉद्वारे वितरण


 

अमरावती, दि २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : नागरिकांमध्ये जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आज शहरात ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर’ उपक्रम पार पडला. सकाळी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र येत युवकांनी वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. यावेळी लकी ड्रॉद्वारे दहा सहभागींना पारितोषिके देण्यात आली.


 

जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश वॉकेथॉनमधून देण्यात आला. या वॉकेथॉनला श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून सुरुवात झाली. विभागीय आयुक्त नयना गुंडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हषवर्धन देशमुख यांनी वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक अभियंता दिलीप निपाने, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, श्री. पाटील, जलसंधारणाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, श्रीकांत उमप, सोनाली काकडे, मुख्याधिकारी विकास खंडारे, शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य गावंडे आदी उपस्थित होते. सुरवातीला विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आली. तसेच उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली.


 

पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन या मार्गे वॉकेथॉन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर पाहोचली. याठिकाणी वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला, तसेच वॉकेथॉनमध्ये सहभागींना पारितोषिके वितरीत करण्यात आली. यात प्रथम तनुजा मेश्राम, द्वितीय कस्तुरी बहुरूपी, तृतीय आयुष मुंढे, तर राजू मुंढे, अंजू कासदेकर, आचल वानखडे, विंजोथ केनॉय, खुशी नवखार, प्रचिती पाटील, अविनाश साऊरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

या उपक्रमात प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागींसाठी महावॉकेथॉन झुंबाचे आयोजन करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages