अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त शासकीय विभागीय ग्रंथालयात काल ‘ग्रंथपाल दिन’ साजरा करण्यात आला.
डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रंथापाल दिनाच्या औचित्याने ग्रंथालय शास्त्राची पाच सुत्रे आणि ग्रंथ व ग्रंथालयाच्या मानवी जीवनातील महत्वावर यावेळी प्रातिनिधीकपणे विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले व श्री.भुयार आणि डॉ. पाटील यांनीही विचार मांडले. ग्रंथालयातील समृद्ध ज्ञान भंडाराचा उपयोग करून स्वत:ला समृध्द करून एक चांगला विद्यार्थी बनण्याचा उपस्थितांनी यावेळी संकल्प घेतला.
0 Comments