जुनी वस्ती बडनेरा,येथे प्रथमच लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी .....
अमरावती ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
०६ ऑगस्ट २०२६
जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही देशातच नाही तर विदेशात सुद्धा साजरी करण्यात येत.त्याच स्पर्शभूमीवर भारतात आणि विशेषतः लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.त्याचं निमित्याने यावर्षी साल २०२६ लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली होती.त्याच स्पर्शभूमीवर प्रथमच जुनी वस्ती बडनेरा येथील मातंग समाजातील काही जागरूक युवकांनी ही लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सहात दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी ,सायंकाळी ७ वाजता दरम्यान साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ता ॲड. राजाभाऊ कलाने, कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक पाहुणे निलेशभाऊ खडसे,जिल्हाध्यक्ष , मातंग अस्मिता संघर्ष सेना,अमरावती,ॲड.शुभम खजोने,साहेबराव लोखंडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता,जुनी वस्ती बडनेरा, ही मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.या कार्यक्रमा दरम्यान मार्गदर्शन करतांना ॲड.राजूभाऊ कलाने यांनी लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे मातंग समाज बांधव यांच्या प्रति योगदान आणि दलीत पीडित कष्टकरी कामगार यांच्या व्यथा कशाप्रकारे पटनाट्य , पोवाळे,अनेक कादंबऱ्या यांच्या माध्यमातून सर्व समाजाच्या व्यथा त्यावेळी लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांनी मांडल्या होत्या यावर प्रकाश टाकला.आणि त्यांच्या संघर्षाचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श मातंग समाज बांधव यांनी घेऊन शैक्षणिक प्रगती कडे वाटचाल करण्याचे संबोधन आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.आणि विशेष निमंत्रक पाहुणे निलेशभाऊ खडसे यांनी मातंग समाजाला मुक्ता साळवे यांचा शैक्षणिक वारसा जपण्याची विनंती केली.तसेच या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन इंगोले,अमोल भोकरे,कैलास भोकरे,महादेव इंगोले,करण इंगोले,यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास अथक प्रयत्न केले.त्यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने सुनील भोकरे,मंगल इंगोले,संदीप भोकरे,अंकुश भोकरे, सुरेश भोकरे , अर्जुन इंगोले, करण इंगोले, अमोल भोकरे,, लड्डूजी खंडारे,देविदास भोकरे,रघुनाथ भोकरे,मारोतराव भोकरे,राजेश भोकरे ,मंगेश भोकरे,किरण भोकरे,ऋषिकेश भोकरे,अजय भोकरे,संतोष भोकरे,योगेश चांदणे, रोहित भोकरे,शैलेश भोकरे,प्रेम भोकरे,कार्तिक भोकरे,योगीराज भोकरे,आदित्य थोरात,वेदांत इंगोले,मंगेश भोकरे, महेंद्र खडसे,जय मोरे,महेश इंगोले, प्रसेनजित प्रधान,महिला मंडळ या मध्ये
प्रतिभा भोकरे, मालू उर्फ बाली इंगोले,वंदना इंगोले, प्रेमीला रमेश भोकरे,प्रेमीला सुनील भोकरे,अरुणा भोकरे, रिता भोकरे,सारिका भोकरे,कोमल खडसे,संध्या भोकरे,लक्ष्मी खडसे, पंचांबाई भोकरे,ललिता बाई भोकरे,मीना बाई भोकरे,मीना भोकरे, शोभा बाई भोकरे,सुरेखा बाजड, दर्शना भोकरे,नंदा बाई लोखंडे,वेदिका लोखंडे,सुमनबाई खडसे, विद्याबाई मोरे,प्रतीक्षा मोरे,अश्विनी इंगोले,छकुली प्रधान,प्रामुख्याने उपस्थित होते.