मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 30, 2026

मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

 

 




अमरावती, ३० :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी कारागृहातील बंद्यांना प्ली बार्गेनिंग म्हजेच शिक्षा किंवा आरोप कमी करून घेण्यासाठी आरोपीने न्यायालयात अथवा फिर्यादीसोबत केलेला गुन्हा कबूल करण्याचा करार, वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. न्यायरक्षक कार्यालयाचे मुख्य अधिवक्ता ॲड. जितेंद्र देशमुख यांनी उपस्थितांना कायदेविषयक विविध हक्क आणि स्पृहा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

 

कारागृह उपअधिक्षक प्रदिप इंगळे यांनी प्रास्ताविक केले. न्यायरक्षक कार्यालयातील सहायक अधिवक्ता ॲड. प्राजक्ता वरुडकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक अधिवक्ता ॲड. सृष्टी शिरभाते यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages