विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 23, 2026

विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात




अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 
जिल्हा व सत्र न्यायालय येथे बुधवार, दि. 22 जुलै रोजी विधी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळेला 73 नवनियुक्त विधी स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी प्रत्यक्षरित्या, तसेच तालुकास्तरावर नवनियुक्त 207 विधीस्वयंसेवक आभासी पद्धतीने उपस्थित  होते.



प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उज्वला नंदेश्वर, जिल्हा व सत्र न्यायालय जिल्हा न्यायाधीश ए. जी. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, तसेच जिल्हा सहकारी वकील परिक्षीत गणोरकर यांचे हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी उज्वला नंदेश्वर यांनी विधी स्वयंसेवक यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये विधी स्वयंसेवक यांना विविध विषयावर प्रमुख वक्ते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये विधी स्वयंसेवक यांना ॲड. सपना काळे, श्री. विधळे, पॅनल अधिवक्ता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती सखी वन स्टॉप सेंटरच्या समुपदेशिका वर्षा देशमुख, सायबर सेलचे निखील माहुरे, प्रा. रचना पिंपळगावकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्या सुचिता बर्वे, वाहतुक शाखेच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राम्हणे, समुपदेशिका वनिता राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामधील उपमुख्य अधिवक्ता ॲड. अमित सहारकर, पंजाबराव विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमात विधी स्वयंसेवक यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages